Janjagruti Abhiyan

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्यानिमित्ताने समाजाला विविध सामाजिक विषयांवर संदेश व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्सच्या २०० विद्यार्थ्यांनी भू-वायू-जल या तिन्ही भारतीय सैन्यदलाचे नेतृत्व करत या जनजागृती रॅलीत सहभाग नोंदविला होता. या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आपले सादरीकरण करून जनजागृती केली. या प्रसंगी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सागर उल्हासराव ढोले पाटील, सेक्रेटरी सौ. उमा सागर ढोले पाटील, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांच्यासह सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.बाप्पाला निरोप देणाऱ्या मिरवणुकीत तरुणाईसह प्रत्येकाची चंगळ असते.सार्वजनिक उत्सवात तरुणाईसह प्रत्येक स्तरातील व्यक्ती सहभागी होऊन जल्लोष साजरा करतो. त्यामुळे या सार्वजनिक उत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येकाला काहीतरी सामाजिक संदेश द्यावा व विद्यार्थ्यांना समाजमूल्यांची जाण व्हावी आणि
विद्यार्थ्यांकडून सर्वत्र चांगला सामाजिक संदेश जावा. असा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन यांचा मानस होता. त्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या सामाजिक विषयांवरील जनजागृती रॅली सर्वत्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन जनजागृती, वृक्ष दिंडी, आदी विषयांवर जनजागृती करणारे संदेश व पाठ संचालन करण्यात आले. यात विशेष आकर्षण म्हणजे बाप्पाच्या मार्गावर विद्यार्थी व विद्यार्थिनिंनी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य केले.
- Janjagruti Abhiyan - 2019
- Janjagruti Abhiyan - 2019
- Janjagruti Abhiyan - 2019
- Janjagruti Abhiyan - 2019
- Janjagruti Abhiyan - 2019
- Janjagruti Abhiyan - 2019