महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद पुणे व ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स ऍन्ड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक प्रशिक्षण या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद पुणे व ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स ऍन्ड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक प्रशिक्षण या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पुणे शहर, भोर, शिरुर व हवेली, येथिल उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेजच्या १५०० प्राध्यापकांनी लाभ घेतला. २४ ते ३० सप्टेंबर सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवून समाजाला जबाबदार नागरिक देन्यासाठी प्रयत्नशिल राहावे असे ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर उल्हासराव ढोले पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी बोलतांना उपस्थित शिक्षकांना आवाहन केले. या प्रसंगी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सौ. उमा सागर ढोले पाटील तसेच ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यशाळेत उपस्थित प्राध्यापकांना, एचएससी बोर्डाचे विभागिय सचिव बी.के.दहिफळे व जिल्हापरिषदेच्यावतीने सहाय्यक शिक्षक निरिक्षक अशोक पानसरे यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. सुप्रिया शेळके व ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स ऍण्ड सायन्सच्या सर्व शाखांतील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
- Teachers Training - 2019
- Teachers Training - 2019
- Teachers Training - 2019
- Teachers Training - 2019